शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; याचिकेत केली ‘ही’ मागणी

| Updated on: Feb 20, 2023 | 5:43 PM

VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका, कोणते मुद्दे मांडले? बघा व्हिडीओ

Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटात आक्रमक झाला. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेत निवडणूक आयोगाच्या विरोधात महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. ठाकरे गटाने याचिकेत कोणते मुद्दे मांडले बघा व्हिडीओ…

उद्धव ठाकरे यांनी याचिकेत निवडणूक आयोगाविरोधात काय मुद्दे मांडले?

1) निवडणूक आयोगाची भूमिका निष्पक्ष नाही.

2) निवडणूक आयोगाच्या कामकाजाची वागणूक घटनात्मक दर्जाला अनुसरून नाही.

3) अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या आमदारांच्या युक्तिवादाच्या आधारे निर्णय घेण्यात आयोगाने चूक केली.

4) पक्षात फूट पडल्याचा पुरावा नसताना आयोगाने दिलेला निर्णय चूक

5) निवडणूक आयोगाने या प्रकरणाची घटनात्मक पातळीवर तपासणी केली नाही.

6) पक्षाच्या संघटनेत आपल्याकडे बहुमत, उद्धव ठाकरे यांच्या दावा