‘मराठी माणूस म्हणून नितीन गडकरी यांना लक्ष्य केलं’, कॅगच्या अहवालावरून अरविंद सावंत यांचं टीकास्त्र
VIDEO | कॅगच्या रिपोर्टमध्ये नितीन गडकरी यांच्या खात्यावर ताशेरे अन् कॅगच्या अहवालावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांचं मोठं विधान, म्हणाले, 'नितीन गडकरींना मराठी माणूस म्हणून लक्ष्य केले जात आहे'
मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | ‘एका किलोमीटरच्या बांधकामासाठी 15 ते 25 कोटी रुपयांचा खर्च लागणार होता तिथं प्रतिकीलोमीटर अडीचशे कोटी किलोमीटर जाऊन पोहोचला. सहा-सात लोकांवर कॅगनेट ताशेरे ओढले आहेत. इतकेच काय तर पंतप्रधानांच्या आयुष्यमान भव या योजनेवर देखील ताशेरे ओढण्यात आले आहेत. हाच रिपोर्ट दुसऱ्या पार्टीची सत्ता असताना आला असता तर भारतीय जनता पार्टी कशी वागली असती’, असा सवाल ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, सिलेंडर 350 रुपये असताना आंदोलन झाली पण आता ११५० रुपये किंमत झाली आहे तरी सगळे घरी बसून आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. कॅगच्या रिपोर्टमध्ये नितीन गडकरी यांच्या खात्यावर ताशेरे ओढण्यात आलेत. मात्र मुद्दाम मराठी माणसाच्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप विरोधकासह अरविंद सावंत यांनी केलाय. नितीन गडकरींना मराठी माणूस म्हणून लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या दृष्टीने ते अडथळे आहेत आमच्या दृष्टीने ते मराठी माणूस आहेत बरोबर त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे कॅग रिपोर्टची चौकशी झाली पाहिजे, असे मागणी अरविंद सावंत यांनी केली.
