ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, ‘या’ महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकला रामराम
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिल्पा बोडखे यांनी केला आहे. तर याआधी मनीषा कायंदे नंतर मीना कांबळी यांनी मला त्रास दिला यानंतर आता विशाखा राऊत यांच्याकडून खच्चीकरण
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या विदर्भातील नेत्या शिल्पा बोडखे यांनी आपला राजीनामा दिला आहे. उद्या पूर्व विदर्भात ठाकरे गटाचं शिबीर आहे. आणि या शिबीराच्या पूर्व संध्येलाच शिल्पा बोडखे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केले आहे. ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिल्पा बोडखे यांनी केला आहे. तर याआधी मनीषा कायंदे नंतर मीना कांबळी यांनी मला त्रास दिला यानंतर आता विशाखा राऊत यांच्याकडून खच्चीकरण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत. अशातच ठाकरे गटातून एक राजीनामा आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Feb 22, 2024 06:43 PM
