Vinayak Pande Video : ‘ताईंना तिकीसाठी मी इतके पैसे…’, नीलम गोऱ्हेंवर आरोप करताना ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर पद मिळतं असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून एकच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांनी भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नवी दिल्लीत नुकतेच अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनातील शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर पद मिळतं असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून एकच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांनी भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले असा खळबळजनक गौप्यस्फोट करत नीलम गोऱ्हेंनी 100 टक्के तिकीट देतो असं आश्वासन दिलेलं. पण अजय बोरस्तेला तिकीट मिळाल्याचे विनायक पांडे म्हणाले. तर मी शहरप्रमुख, उपमहापौर झालो, उद्धव ठाकरेंनी एक रुपया माझ्याकडे मागितला नाही. ठाकरेंकडे अशा गोष्टी घडत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तर निलम गोऱ्हेंनी हे पैसे कोणाकडे दिले? असा सवाल केला असता विनायक पांडे यांनी स्पष्टच सांगितलं, मला माहिती नाही. उद्धव ठाकरेंना याची कल्पना आहे की नाही हे मला माहिती नाही. हे नेते तिथपर्यंत पोहोचूच देत नसतील, तर उद्धव ठाकरेंना कसं कळणार, असं मोठा खुलासा विनायक पांडेंनी केला. पुढे त्यांना असेही म्हटले, “अनेक नेते पुढे येतील. पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई कार्यकर्त्यांना पुढे जाऊ द्यायच्या नाही. हे सत्य आहे”
