ठाकरे घराण्याचा व्हीप आम्ही मानतो, कुण्या गद्दाराचा नाही; ठाकरे गटाच्या आमदाराची आक्रमक भूमिका

ठाकरे घराण्याचा व्हीप आम्ही मानतो, कुण्या गद्दाराचा नाही; ठाकरे गटाच्या आमदाराची आक्रमक भूमिका

| Updated on: Feb 18, 2023 | 7:51 PM

VIDEO | आमदाराकी हा छोटा विषय, आमच्यासाठी मातोश्री महत्वाची; ठाकरे गटाच्या आमदारानं व्यक्त केला विश्वास

विनायक डावरुंग, मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं काल शिवेसना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव हे दोन्ही शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली. यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटातील सर्व आमदारांना येत्या अधिवेशनात व्हीप जारी करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाष्य केले आहे. येत्या अधिवेशनात व्हीप जारी जरी केलं तर ज्यांची क्षमता नसते ते कारवाईला भीत असतात. आमच्यासाठी व्हीप फक्त उद्धव ठाकरे यांचाच. आम्ही दुसऱ्या कोणाचा व्हीप मानत नाही. आमदाराकी हा छोटा विषय आहे. आमच्यासाठी मातोश्री महत्वाची आहे. मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे अस्तित्व निर्माण केलं. ९२-९३ च्या दंगलीत हिंदूचं संरक्षण केलं. त्या ठाकरे घराण्याचा व्हीप आम्हाला चालतो. कुण्या गद्दाराचा नाही, असे नितीन देशमुख म्हणाले.

Published on: Feb 18, 2023 07:49 PM