‘कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे’, कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

| Updated on: Aug 01, 2023 | 10:47 AM

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबतच्या निकालावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले होते. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तत्कालीन राज्यपाल यांनी घेतलेली भूमिका ही अयोग्य होती.

Follow us on

कोल्हापूर: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुंबईत आगमन झालं आहे.मुंबई विमानतळावर कोश्यारी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबतच्या निकालावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले होते. ‘महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तत्कालीन राज्यपाल यांनी घेतलेली भूमिका ही अयोग्य होती. राज्यपालांचा बहुमत चाचणीचा आदेश उद्धव ठाकरे यांना देणं बेकायदेशीर होतं’, असे सर्वोच्च न्यायालयाने निकाला म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. भगतसिहं कोशारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गट करत आहे. या मागणीसाठी ठाकरे गटाने कोल्हापुरात मोर्चा काढला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. पितळी गणपती चौकापासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.