Dahi Handi 2025 : मच गया शोर… जय जवानचा रेकॉर्ड ब्रेक, 10 थर अन् कोकण नगर गोविंदा पथकाचा विश्वविक्रम

Dahi Handi 2025 : मच गया शोर… जय जवानचा रेकॉर्ड ब्रेक, 10 थर अन् कोकण नगर गोविंदा पथकाचा विश्वविक्रम

| Updated on: Aug 16, 2025 | 3:13 PM

जय जवानचा रेकॉर्ड ब्रेक करत 10 थर रचून कोकण नगर गोविंदा पथकाने विश्वविक्रम केल्याने कोकण नगरच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दहीहंडीच्या इतिहासात त्यांनी एक नवा अध्याय जोडला आहे.

ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ठाण्यात अनेक प्रसिद्ध आणि मानाच्या दहीहंड्यांची दरवर्षी चांगलीच चर्चा असते. ठाण्यातील प्रतिष्ठेच्या दही हंड्या फोडण्यासाठी जय जवान गोविंदा पथक हजेरी लावून आपल्या नावावर विक्रम करण्याच्या तयारी असते. मात्र यंदा जय जवान गोविंदा पथकाचा हा रेकॉर्ड ब्रेक कऱण्यात आल्याचे पाहायला मिळालंय. आज ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात मुंबईतील जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल 10 थर रचून विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी मुंबईतील ‘जय जवान’ गोविंदा पथकाचा 9 थरांचा विक्रम होता, तो कोकण नगरच्या संघाने मोडीत काढला आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून कोकण नगर गोविंदा पथक 10 थरांचा सराव करत असल्याची माहिती मिळतेय. तर यापूर्वी 2022 मध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने 9 थरांचा विक्रम याच ठिकाणी केला होता. यावर्षी त्यांनी जिद्द आणि कठोर मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर 10 थर रचून यंदा आपले स्वप्न पूर्ण केलंय.

Published on: Aug 16, 2025 03:08 PM