छावा संघटना आक्रमक! शिवसैनिकाची गाडी फोडली
बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना छावा संघटनेनं समर्थन दिल्याचं यावेळी दिसून आलंय. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांची गाडी फोडलीये.
बीड: काही ठिकाणी एकनाथ शिंदेंविरोधात सुद्धा काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आलेत. पालघरमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेत. एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरुये. बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक (Shivsainik) रस्त्यावर उतरलेत. तर काही ठिकाणी बंडखोरांचं समर्थन केलं जातंय. बीडमध्ये छावा संघटना आक्रमक झालीये. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना छावा संघटनेनं (Chhava Sanghtana) समर्थन दिल्याचं यावेळी दिसून आलंय. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांची गाडी फोडलीये. बंडाचा झेंडा फडकावून आता जवळपास आठवडा उलटलाय तरी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) परतलेले नाहीत. शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Published on: Jun 26, 2022 01:01 PM
