Viral Video: सगळी ताकद पणाला लावली,आयुष्य परत जिंकलं! सापाच्या तावडीतून जीव परत मिळवला, बघा व्हिडीओ.

Viral Video: सगळी ताकद पणाला लावली,आयुष्य परत जिंकलं! सापाच्या तावडीतून जीव परत मिळवला, बघा व्हिडीओ.

| Edited By: | Updated on: Jul 19, 2022 | 12:00 PM

असं म्हणतात जीव जेव्हा शेवटच्या घटका मोजत असतो तेव्हा अचानक कुठून तरी हिंमत येते, ताकद येते जीव वाचवायचा प्रयत्न करायची. कदाचित ती जिवंत राहण्याची इच्छाच असावी जी कुणालाही स्वतःचा जीव वाचविण्याची ताकद देत असावी.

वाशिम: अशी कोणती गोष्ट आहे जी आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची आहे? अशी कोणती गोष्ट आहे ज्या शिवाय कुणीच काहीच नाही? अशी कोणती गोष्ट आहे जी कुणाकडून हिवरावून घ्यायचा आपल्याला काहीच अधिकार नाही. जीव! माणसाचा जीव! प्राण्यांचा जीव! जीवापुढे काहीच नाही. जेव्हा एखाद्याच्या जीवाचा प्रश्न असतो तेव्हा तो माणूस असो किंवा प्राणी जिवाच्या आकांताने स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतो. करणारच! असं म्हणतात जीव (Life) जेव्हा शेवटच्या घटका मोजत असतो तेव्हा अचानक कुठून तरी हिंमत येते, ताकद येते जीव वाचवायचा प्रयत्न करायची. कदाचित ती जिवंत राहण्याची इच्छाच असावी जी कुणालाही स्वतःचा जीव वाचविण्याची ताकद देत असावी. असाच आहे हा व्हिडीओ, एक बेडूक सापाच्या तावडीत सापडलाय. साप (Snake) काय सोडतोय आपलं एक वेळचं जेवण. पण बेडकाचं तर आयुष्य पणाला लागलंय, जिवाच्या आकांताने प्रयत्न करून, सगळं काही पणाला लावून बेडूक शेवटी आपला जीव परत मिळवतो! बघा व्हिडीओ (Video Viral) खूपच छान आहे… आपल्यालाही खूप काही शिकवून जातो!