Special Report | कुलर…विषारी हवा…आणि मृत्यूचं गुढ!

| Updated on: Apr 29, 2022 | 10:25 PM

नाशिकच्या महडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कुलरजवळ ठेवलेल्या किटकनाशक औषधांचा द्रव कुलरच्या हवेतून खोलीत पसरल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Follow us on

नाशिकच्या महडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कुलरजवळ ठेवलेल्या किटकनाशक औषधांचा द्रव कुलरच्या हवेतून खोलीत पसरल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच नातवाचा आणि आजोबांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आज त्यांच्यापैकी गंभीर असलेल्या नातीचाही मृत्यू झाला. त्यामुळे कुलरमुळे मृत्यू होऊ शकतो असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्या चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर त्या मुलांची आईची मृत्यूशी झुंज चालू आहे. त्यामुळे कुलर वापरणाऱ्यांनी जपून कुलर वापरण्याची सूचना आता देण्यात येऊ लागली आहे.