Special Report | वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण

| Updated on: May 13, 2022 | 9:56 PM

न्यायालयाने 17 मे रोजी सर्वेक्षणाचा पुढील अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पण एकाच कोर्ट कमिश्नरऐवजी कोर्टानं आणखी दोन वकिलांची नियुक्ती केलीय. म्हणजेच कोर्ट कमिश्नर आणि दोन वकिल यांच्यामार्फत आता मशिदीचं सर्वेक्षण होईल.

Follow us on

YouTube video player

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचं शनिवारी सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले वकील आयुक्त अजयकुमार मिश्रा यांना हटवण्यास न्यायालयाने नकार दिला. यासोबतच 17 मे पूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या तळघराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने 17 मे रोजी सर्वेक्षणाचा पुढील अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पण एकाच कोर्ट कमिश्नरऐवजी कोर्टानं आणखी दोन वकिलांची नियुक्ती केलीय. म्हणजेच कोर्ट कमिश्नर आणि दोन वकिल यांच्यामार्फत आता मशिदीचं सर्वेक्षण होईल. कोर्टाचा निर्णय पहाता याचिकाकर्त्यांना हा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.