Gondia | धक्कादायक! गोंदियात दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीला दिला तिसरा डोस

Gondia | धक्कादायक! गोंदियात दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीला दिला तिसरा डोस

| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 7:31 AM

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला चक्क तिसरा डोस देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील  बिरसोला येथील प्राथमिक उपकेंद्रात उघडकीस आला आहे. तिसऱ्या डोसमुळे कुठलाही दुष्परिणाम झाला नसला, तरी यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला चक्क तिसरा डोस देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील  बिरसोला येथील प्राथमिक उपकेंद्रात उघडकीस आला आहे. तिसऱ्या डोसमुळे कुठलाही दुष्परिणाम झाला नसला, तरी यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. शिवाय लस घेणाऱ्यांचे रेकॉर्ड या केंद्रामध्ये उपलब्ध असते की नाही, यावरसुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भागवत नागफासे वय 45 वर्ष, बिरसोला असे तीन डोझ घेणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती सद्धा दहशतीत आहे.