साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ आणि नाशकात छगन भुजबळ? लोकसभा नेमकी कोण लढणार?

| Updated on: Mar 28, 2024 | 11:34 AM

नाशिकवरून शिंदे आणि भाजप यांच्या दावेदारीच्या वादात ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीच्या फुटीआधी साताऱ्याची असणारी जागा आता भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. बघा काय आहे अदलाबदलीची गणितं....

Follow us on

सातारा आणि नाशिक या दोन्ही जागांवरून महायुतीत अदला-बदली होणार असल्याची चर्चा होतेय. नाशिकवरून शिंदे आणि भाजप यांच्या दावेदारीच्या वादात ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीच्या फुटीआधी साताऱ्याची असणारी जागा आता भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. याआधी शिवसेनेकडे असलेली अमरावतीची जागा आता भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. आधी राष्ट्रवादी लढत असलेली परभणीची जागा आता अजित पवार गट आणि भाजपचा मित्रपक्ष रासपकडे देण्याची शक्यता आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेची नाशिकच्या जागेच्या वादामुळे ही जागा आता अजित पवार गटातील छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. पण नाशिकची जागा छगन भुजबळ यांच्याकडे देण्याच्या चर्चेवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर साताऱ्यात सक्षम उमेदवार नसल्याने अजित पवार गटाकडून मात्र उदयनराजे भोसले यांच्यासाठी जागा सोडण्यास फारसा विरोध दिसत नाहीये. बघा काय आहे अदलाबदलीची गणितं….