Nagpur | नागपुरात परिचारिकांच्या कामबंद आंदोलनाचा तिसरा दिवस, आरोग्य व्यवस्था कोलमडली

Nagpur | नागपुरात परिचारिकांच्या कामबंद आंदोलनाचा तिसरा दिवस, आरोग्य व्यवस्था कोलमडली

| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 11:45 AM

नागपुरातील परिचारिकांनी त्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून परिचारका आंदोलनात असल्याने नागपुरची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.

राज्यभरात कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या परिचारिकांनीच नागपुरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. काही महत्त्वाच्या मागण्यासाठी हे आंदोलन सुरु असून गेले तीन दिवस झाले आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे शासकिय रुग्णालयातील बऱ्याच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया सोडता बाकी शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.