Jammu- Kashmir Attack : उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण

Jammu- Kashmir Attack : उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण

| Updated on: Apr 25, 2025 | 2:23 PM

Pahalgam terrorist attack update : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. यात भारतीय लष्कराचे हवालदार झंटू अली शेख यांना वीरमरण आले आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 24 तासां सलग तिसरी चकमक झाली आहे. उधमपूरच्या दुडू बसंतगडमध्ये सुरक्षा दलांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या चकमकीत भारतीय लष्कराचे हवालदार झंटू अली शेख देशासाठी शहीद झाले आहेत. चकमकीत झालेल्या गोळीबारात, त्यांना गंभीर दुखापत झाली आणि नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published on: Apr 25, 2025 02:23 PM