Pakistan Support Arrests : पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
Nalasopara Pakistan support arrests : नालासोपारा येथे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत असताना पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना पोलिसांनी आज अटक केली आहे.
पाकिस्तान समर्थन प्रकरणी नालासोपारा येथील तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. उस्मान गणी इक्बाल सय्यद, तौशिद शेख आणि अदनान शेख अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दहशतवादी कृत्याचं समर्थन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. 26 एप्रिल रोजी नालासोपारा येथे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत असताना या निषेध आंदोलनात हा वाद झाला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Published on: Apr 28, 2025 12:52 PM
