मुंब्र्याच्या मनसे कार्यालयाबाहेर दगडफेक, तीन जण ताब्यात

मुंब्र्याच्या मनसे कार्यालयाबाहेर दगडफेक, तीन जण ताब्यात

| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 3:27 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भोंग्याच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या वक्तव्याविरोधात मुंब्रा इथल्या मनसे कार्यालयाबाहेर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भोंग्याच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या वक्तव्याविरोधात मुंब्रा इथल्या मनसे कार्यालयाबाहेर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेनंतर कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात या दगडफेकीविरुद्ध तक्रार दाखल झाली असून तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसेच्या फलकावर दगड मारून फडतानाचे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाल आहे. हा फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी म्हणजेच अयाज बबलू यांनी फाडला असल्याचा आरोप यावेळी मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी अय्याज बबलू यांनी मनसेचा हा फलक उतरवण्यासाठी धमकी देत फलक न उतरल्यास आम्ही आमच्या स्टाईलने फलक उतरवू असा इशारा दिला होता.