आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती! प्रभातफेऱ्या, जयघोष, पुतळ्याला अभिवादन

आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती! प्रभातफेऱ्या, जयघोष, पुतळ्याला अभिवादन

| Updated on: Jun 26, 2022 | 12:25 PM

एकीकडे आंदोलन, मोर्चे तर दुसरीकडे शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी. औरंगाबादेत शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आलीये.

औरंगाबाद: आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj) यांची जयंती! राधानगरी धरणातून (Radhanagri Dam)आजही अभेद्यपणे प्रेरणा देणारी शाहू महाराजांची जलनीती आणि तिच्या मुळाशी असलेले त्यांचे कृषीधोरण, यांपासून आजही काही शिकण्यासारखे आहे. दरम्यान आज उत्साहात ही जयंती (Jayanti) साजरी करण्यात आलीये. राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलंय! एकीकडे आंदोलन, मोर्चे तर दुसरीकडे शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी. औरंगाबादेत शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आलीये. यावेळी मिल कॉर्नरजवळील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा जयघोष केलाय, शाळेमार्फत काही ठिकाणी प्रभातफेरी देखील काढण्यात आलीये.