पेट्रोल पंप चालकांचा आज नो पर्चेस डे, इंधनाचा तुटवडा
एक्साइज ड्युटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीचा पेट्रोल पंप चालकांकडून विरोध होत आहे. आज या विरोधात पेट्रोल पंप चालकांनी नो पर्चेस डेची घोषणा केली आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने एक्साइज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला. एक्साइज ड्युटीमध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. मात्र आता या एक्साइज ड्युटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीचा पेट्रोल पंप चालकांकडून विरोध होत आहे. आज या विरोधात पेट्रोल पंप चालकांनी नो पर्चेस डेची घोषणा केली आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल पंप चालक इंधनाची खरेदी करणार नसल्याने इंधनाचा तुटवडा जावण्याची शक्यता आहे.
Published on: May 31, 2022 10:04 AM
