VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11.30 AM | 23 July 2021
चिपळूण शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्याची पातळी ही जवळपास चार ते पाच फुटांनी खाली आली आहे. रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत आहे.
चिपळूण शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्याची पातळी ही जवळपास चार ते पाच फुटांनी खाली आली आहे. रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिपळूणवासियांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. चिपळूणमध्ये सकाळच्या वेळात रिमझिम पाऊस सुरु आहे. चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये 2005 पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली. त्यातच मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे संपर्क साधण्यास अनेक अडचणी येत आहेत.
