VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 10 August 2021
102व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलीचाही सल्ला घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
102व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलीचाही सल्ला घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. आज संसदेत 102व्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. त्याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला. आरक्षणाबाबतची अपवादात्मक परिस्थिती आहेच. त्याबाबत काय करायचं हे राज्य ठरवेल. त्यात कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ. केंद्रानेही घ्यावी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांना कायद्याचे पेच जास्त माहीत आहेत. आम्ही त्यांच्या मतांचा आदर करतो, असे संजय राऊत म्हणाले.
