TOP 9 News | टॉप 9 न्यूज

| Updated on: Sep 27, 2022 | 9:45 AM

सत्तासंघर्षाची सुनावणी योग्य होईल असे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार म्हणाले.

Follow us on

सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पाच सदस्य घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीचं पहिल्यांदाच थेट प्रक्षेपण ही होणार आहे. तर त्या 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचाही समावेश असून कारवाई झाल्यास हे सरकार पडेल. त्याचबरोबर तसे झाल्यास राज्यात राष्ट्रपती लागवड किंवा निवडणूका लागतील असे जयंत पाटील म्हणाले. यादरम्यान सत्तासंघर्षाची सुनावणी योग्य होईल असे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार म्हणाले. तसेच आज निवडणूक आयोगाकडे शिवसेना आपले पुरावे सादर करणार आहे.