Jammu – Kashmir : काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Jammu – Kashmir : काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

| Updated on: Apr 29, 2025 | 3:22 PM

काश्मीरचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. आज पर्यटकांनी पर्यटनासाठी सुरू असलेल्या भागांवर गर्दी केलेली दिसून आली आहे.

काश्मीरमधील काही ठिकाणी पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक परतलेले बघायला मिळत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली होती. मोठ्या संख्येने पर्यटकांनी आपल्या ट्रीप रद्द केल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा काश्मीरच्या काही भागात पर्यटक गर्दी करताना बघायला मिळत आहे. आज काश्मीरमधल्या मुघल गार्डनला पाहण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावली. बंदी नसलेल्या पर्यटनस्थळांवर सध्या पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. प्रमुख 87 पर्यटनस्थळांपैकी 48 संवेदनशील पर्यटनस्थळ हे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत. तर उरलेल्या पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांची काहीशी गर्दी होताना दिसत आहे. दल लेक येथे देखील पर्यटक आलेले दिसून आले. त्यामुळे काश्मीरचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे.

Published on: Apr 29, 2025 03:22 PM