Walmik Karad Video : आकाला ‘स्पेशल 26’ पोलिसांचं प्रोटेक्शन? बीड पोलीस दलात वाल्मिक कराडची पोलिसांची टीम
वाल्मिक कराडची बीड पोलिसात स्पेशल 26 ची टीम कार्यरत असल्याचा गंभीर आरोप होतोय. हा आकडा याहूनही मोठा असून लवकरच त्यांची संपूर्ण यादी मुख्यमंत्री फडणवीस यांना देणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय.
बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सगळीच यंत्रणा वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळींना पोखरल्याचे आरोप होताहेत. अशातच कराडची एक स्पेशल 26 ची टीम पोलीस दलामध्ये कार्यरत होती असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय. मात्र हा आकडा 26 नसून 200 च्या आसपास आहे असा प्रतिदावा सुरेश धस करताहेत. सुरेश धस यांनी आधीच केलेल्या आरोपानुसार परळीमध्ये गांजाची विक्री आकाच्याच वरदस्ताने होते. गावठी बंदूक विक्रीला आकाचाच आशीर्वाद आहे. धक्कादायक म्हणजे अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते वसुलीसाठी कराडच काही पोलीस नेमतो. थर्मल मधील चोरीला जाणारा भंगार, एसटी महामंडळामधून चोरीला जाणारा लोखंड, जुन्या नव्या कंपन्यांकडून हप्ते वसुली, बड्या आणि मोक्याच्या जमिनीचे व्यवहार, रस्त्याची कंत्राट, रेतीपासून खडीपर्यंतचा पुरवठा, परळीमध्ये कोल्ड्रिंक पासून ते प्लास्टिक पर्यंतच्या सगळ्या एजन्सीचा कारभार हा वाल्मिक कराडच्या आदेशानेच चालायचा.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराड आणि काही पोलिसांच्या मधुर संबंधाचे किती आरोप झाले ते पाहूया. कराड सोबत दोन सरकारी पोलीस कायम असायचे मात्र जेव्हा कराडवर गुन्हा नोंदवला गेला तेव्हा सरकारचेच पोलीस कराडच संरक्षण सोडून माघारी परतले आणि कराड आरामात फरार झाला. बीड एसपी अविनाश बारगळ यांच्यावर गुन्हा नोंदवून घेण्यास दिरंगाईचा आरोप झाल्यानंतर त्यांची बदली केली गेली. तर केसचे पीएसआय राजेश पाटील देशमुख हत्येनंतर आरोपींना भेटले. खंडाणी प्रकरणावेळी चक्क पीएसआय राजेश पाटील कराड आणि आरोपीच्या टोळीसबत फिरत असतानाच सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं. या प्रकरणामध्ये पीएसआय राजेश पाटील यांचं निलंबन केलं गेलं. एसआयटीमध्ये सामील असलेले पोलीस महेश विग्ने यांचे कराडसोबत चांगले संबंध असल्याचा आरोप झाला. आरोपानंतर एसआयटी नव्याने गठित केली गेली. अटकेनंतर कराडला ज्या बीड कोठडीमध्ये ठेवलं गेलं तिथेच पीआय शीतल कुमार बल्लाळ आणि कराड यांच्या मैत्रिपूर्ण संबंधांची एक कथित क्लिप व्हायरल झाली. या प्रकरणामध्ये बल्लाळच्या चौकशीची शक्यता आहे.
