Bycott Turkey : आधी पाकिस्तानला छुपा पाठिंबा, आता उघडपणे तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात…

Bycott Turkey : आधी पाकिस्तानला छुपा पाठिंबा, आता उघडपणे तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात…

| Updated on: May 14, 2025 | 4:26 PM

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कस्ताने युद्ध क्षेपणास्त्रांपासून ते ड्रोनपर्यंत सर्व काही पुरवून पाकिस्तानला मदत केली. तुर्कस्तानचे हे वर्तन भारतातील लोकांना आवडले नाही. त्यामुळे भारतानं एक मोठा निर्णय घेतलाय.

चांगल्या आणि वाईट काळात नेहमीच पाकिस्तानसोबत उभं राहू, असं म्हणत तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी ट्वीट केले आहे. पाकिस्तानच्या बंधू भावांच्या लोकांसोबत आम्ही उभं राहू असंही तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी म्हटलंय. तर आम्हाला पाठिंबा दिला त्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शकीफ यांनी आभार मानले. छुपी मदत पाठवणाऱ्या तुर्कस्तानकडून आता पाकिस्तानला उघड पाठिंबा देण्यात येत आहे. या पाठिंब्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शकीफ यांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कस्तानची दोन कार्गो विमानं ही पाकिस्तानच्या भूमीत उतरली होती. या छुप्या पाठिंब्यानंतर आता उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला जात आहे. भारत-पाकिस्तान युद्धात तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला. म्हणून तुर्कस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय भारतानं घेतला. तुर्कस्तान आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली आहे.

Published on: May 14, 2025 12:53 PM