TV9 Impact | ‘टीव्ही9’च्या बातमीचा दणका, शेतकऱ्यांना निकृष्ट साहित्य पुरवठ्याची चौकशी होणार
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कृषी विभागाच्या 'आत्मा' योजनेंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार आहे. नागपूर कृषी विभागाने या चौकशीचे आदेश दिले आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं कृषी साहित्य अव्वाच्या सव्वा किमती लावून देण्यात आलं होतं. याबाबत टीव्ही 9 मराठीने 26 ऑगस्टला या भ्रष्टाचाराची बातमी दाखवली.
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार आहे. नागपूर कृषी विभागाने या चौकशीचे आदेश दिले आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं कृषी साहित्य अव्वाच्या सव्वा किमती लावून देण्यात आलं होतं. याबाबत टीव्ही 9 मराठीने 26 ऑगस्टला या भ्रष्टाचाराची बातमी दाखवली. शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत चौकशीची मागणी केली होती. अखेर याचा परिणाम होऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी विभागाने दिलेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
