Eknath Shinde Program : टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की; शिंदेंच्या सभास्थळी घडला प्रकार
Eknath Shinde Abhar Rally Program : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार दौरा सुरू केला आहे. आज यवतमाळमध्ये त्यांची सभा होत आहे. यावेळी पोलिसांकडून माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्यात आली आहे.
टीव्ही 9 मराठीचे पत्रकार विवेक गावंडे यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभास्थळी पत्रकारांसोबत ही धक्काबुक्की झाली आहे. सभास्थळी प्रवेश देण्यावरून पोलिसांनी हुज्जत घातली. तसंच 10 ते 12 पोलिसांनी 2 पत्रकारांसोबत हातापायी देखील केली आहे.
आभार दौऱ्यानिमित्त आज यवतमाळच्या कोस्टल मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. यावेळी चेकिंग पॉइंटवर काही पोलिसांनी माध्यमांच्या पत्रकारांशी हुज्जत घातली. तसंच 2 पत्रकारांना मारहाण देखील करण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.
Published on: Apr 03, 2025 07:04 PM
