Nagpur : मराठी शाळा टिकवण्याची तळमळ! फक्त दोन विद्यार्थ्यांसाठी भरते शाळा

Nagpur : मराठी शाळा टिकवण्याची तळमळ! फक्त दोन विद्यार्थ्यांसाठी भरते शाळा

| Updated on: Jul 16, 2025 | 1:52 PM

Nagpur Marathi School : हत्तीबोडी येथील शाळेत फक्त दोनंच विद्यार्थी आहेत. दोन विद्यार्थी असलेली शाळा तुम्ही बघीतली?

गजानन उमाटे, प्रतिनिधी

राज्यात मराठी आणि हिंदी विषयावरुन वादळ उठलं असतानाच, आज आम्ही तुम्हाला दाखवणार दोन विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेली एक अनोखी मराठी शाळा. सरकारने नागपूर जिल्ह्यातील हत्तीबोडी गावातील मराठी शाळा कायमची बंद होऊ नये म्हणून अवघ्या दोन विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरु ठेवलीय. हत्तीबोडी या गावात, आर्यन आणि श्लोक या दोन विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्च करुन ही शाळा सुरु आहे.

नागपूरपासून ९० किलोमीटरचा प्रवास करुन भिवापूर तालुक्यातील या हत्तीबोडी गावातील प्राथमिक शाळेतजाता येतं. केवळ दोन विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेली ही मराठी शाळा असून श्लोक चौधरी आणि आर्यन धुर्वे हे दोन विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणून ही शाळा सुरु ठेवण्यात आलीय. या अनोख्या शाळेवर ‘टीव्ही ९ मराठी’चा हा स्पेशल रिपोर्ट..

Published on: Jul 16, 2025 01:51 PM