Rohit Arya Encounter : रोहित आर्या दहशतवादी, उदय सामंत यांचे वक्तव्य

Rohit Arya Encounter : रोहित आर्या दहशतवादी, उदय सामंत यांचे वक्तव्य

| Updated on: Oct 31, 2025 | 12:28 PM

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित आर्याला दहशतवादीच संबोधले आहे. 19 लोकांना जाळण्याच्या धमकीनंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका का घ्यावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलिसांची कारवाई योग्य होती असे त्यांचे मत आहे. अशा धमक्या देणारा दहशतवादीच असू शकतो, असे सामंत म्हणाले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित आर्या प्रकरणात मोठे वक्तव्य केले आहे. रोहित आर्या हा दहशतवादीच होता, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. सामंत यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत, 19 लोकांना जाळण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी बघ्याची भूमिका का घ्यावी, असा प्रश्न उपस्थित केला.

सामंत यांच्या मते, पोलिसांनी त्यांची भूमिका योग्य पद्धतीने बजावली आहे. जर कोणी या प्रकरणी न्यायालयात गेले, तर कायदेशीर लढाई होईल, असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, “मला असे वाटते की तुम्हाला देखील असे वाटत असेल की 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो कदाचित दहशतवादीच होता. अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यायची? 19 लोकांना जाळण्याची धमकी देणाऱ्याबद्दल बघ्याची भूमिका घ्यायची होती का ?” त्यामुळे, कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय योग्यच होता, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Published on: Oct 31, 2025 12:28 PM