Thackeray vs Shinde : टशन कायम… शिंदे-ठाकरे आमने सामने, एकमेकांना पाहणंही टाळलं अन् बाजूला बसण्यास स्पष्ट नकार; फोटो सेशनवेळी नेमकं काय घडलं?

Thackeray vs Shinde : टशन कायम… शिंदे-ठाकरे आमने सामने, एकमेकांना पाहणंही टाळलं अन् बाजूला बसण्यास स्पष्ट नकार; फोटो सेशनवेळी नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 17, 2025 | 9:35 AM

जवळपास तीन वर्षानंतर दोन्ही नेते अगदी जवळ समोरासमोर आले. पण फोटो सेशनच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या बाजूला बसण्यास स्पष्ट नकार दिला. विधानभवनात नेमकं काय घडलं?

अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या फोटो सेशनवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आले. पण ना ठाकरेंनी शिंदेकडे पाहिलं ना शिंदेंची नजर ठाकरेंकडे गेली. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणेही टाळलं. ही दृश्ये फार बोलकी आणि तितकीच राजकीय कटुता कशी कायम आहे हे दाखवणारी आहेत. सुरुवातीला फोटो सेशनसाठी मुख्यमंत्री आणि दानवेन्सह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बसले. त्याच वेळेला उद्धव ठाकरे आले. उद्धव ठाकरे येताच सर्वच नेते खुर्चीवरून उभे राहिले आणि हातवाऱ्याने खुर्चीवर बसण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे थेट एकनाथ शिंदे बसलेल्या बाजूने गेले. ठाकरे आल्याचं पाहून शिंदेंनी चष्म्याला हात लावला आणि बाजूलाच असलेल्या राम शिंदे सोबत बोलण्यात ते मग्न झाले. त्याच वेळेला नीलम गोऱ्हेंनी शिंदेंच्याच बाजूलाच असलेल्या खुर्चीमध्ये बसण्याची विनंती केली.

नीलम गोऱ्हेंनी इशारा करत दोन तीन वेळा तिथेच बसा म्हणून आग्रह केला. पण उद्धव ठाकरेंनी हसत नकार दिला. आणि शिंदेंच्या बाजूने गोऱ्हेंना बसण्यास सांगून स्वतः समोरच्या बाजूला गेले. दुसरीकडे धावत अंबादास दानवे आले आणि माझ्या बाजूला बसा अशी विनंती करत होते. तर शिंदेंनी नीलम गोऱ्हेंना खुर्चीमध्ये बसण्याचा इशारा केला. गोरेही त्वरित बसल्या आणि उद्धव ठाकरेही शिंदेना टाळत गोऱ्हेंच्याच दुसऱ्या बाजूला बसले. अखेर मिनिटभरातल्या त्या ड्राम्यानंतर अखेर फोटो निघाला.

Published on: Jul 17, 2025 09:35 AM