Uddhav Thackeray | … तर महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | … तर महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन : उद्धव ठाकरे

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 8:19 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणि कोरोनाची तिसरी लाट यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. राज्यात तिसरी कोरोनाची लाट आली तर लॉकडाऊन लावावा लागेल असं ठाकरे यांनी म्हटलंय. तसेच कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.  

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियम शिथील केले आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणि कोरोनाची तिसरी लाट यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. राज्यात तिसरी कोरोनाची लाट आली तर लॉकडाऊन लावावा लागेल असं ठाकरे यांनी म्हटलंय. तसेच कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.