Uddhav Thackeray : हाणामारी करणारे समर्थक होते की गुंड? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

Uddhav Thackeray : हाणामारी करणारे समर्थक होते की गुंड? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

| Updated on: Jul 17, 2025 | 7:32 PM

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील हाणामारीच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील हाणामारीच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ही हाणामारी करणारे समर्थक होते की गुंड? जर विधान भवनात अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, तर मग विधान भवनाचा काय अर्थ? ज्यांनी या लोकांना प्रवेशासाठी पास दिले, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. या पास देणाऱ्यांची नावे समोर यायला हवी. हा अधिकार सभापतींचा आहे, पण त्यांची दिशाभूल झाली का, हाही प्रश्न आहे. विधान भवनात आमदारांवर धक्काबुक्की आणि गुंडागर्दी पोहोचली असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.

ठाकरे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सर्व मुद्दे बाजूला ठेवून या गुंडांवर आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कडक कारवाई करावी. अशी कारवाई झाली, तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या समोर तोंड दाखवण्यास पात्र आहात, असे मी म्हणेन. विधान भवनासारख्या पवित्र संस्थेचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. जर वाद वैयक्तिक असतील, तर ते बाहेर व्हायला हवेत. पण विधान भवनात गुंड आणणाऱ्यांची आणि पास देणाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ठाकरे यांनी केलेल्या कारवाईच्या मागणीने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Published on: Jul 17, 2025 07:31 PM