‘एक काळा टोपीवाला होता…’, उद्धव ठाकरे यांची भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका; बघा व्हिडीओ

‘एक काळा टोपीवाला होता…’, उद्धव ठाकरे यांची भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका; बघा व्हिडीओ

| Updated on: Mar 05, 2023 | 8:54 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी खेडमधील जाहीर सभेतून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले...

रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी खेडमध्ये जाहीर सभा होतेय. यासभेत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असताना त्यांनी अनेकदा सावित्रीबाई आणि महात्म फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली होती. हा दोरा धरुन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “एक काळी टोपीवाला होता, गेला. त्याने शिवाजी महाराज यांचा अपमान केला, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तरीही यांच्या शेपट्या बाहेर येत नाहीत. दिल्लीसमोर शेपटी आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापी नव्हते”, असं उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.

Published on: Mar 05, 2023 08:54 PM