Special Report | अमित शाह-उद्धव ठाकरेंची लंच डिप्लोमसी, नक्षलग्रस्त भागासाठी 1200 कोटी द्या : ठाकरे

Special Report | अमित शाह-उद्धव ठाकरेंची लंच डिप्लोमसी, नक्षलग्रस्त भागासाठी 1200 कोटी द्या : ठाकरे

| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 9:42 PM

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण केलं. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण केलं. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्गम भागात नवीन पोलीस पोस्ट स्थापन करणे, नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणे, नवीन शाळा बांधण्यावर भर देणे आदींसाठी हा निधी लागणार आहे. त्याबाबतचे सादरीकरणच मुख्यमंत्र्यांनी शहांना दिलं.