Sanjay Raut : ‘तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही’, संजय राऊतांचा कोणावर निशाणा?
काल आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. दरम्यान, यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केला.
मोठ्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला. काल आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. दरम्यान, यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. सत्तेचं रक्त लागल्यामुळे काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. बहुमत गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला होता, पण ठाकरेंप्रमाणे वागायला काहींना जमत नसल्याने आदळआपट करत आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडल्याचे पाहायला मिळाले. पुढे संजय राऊत असेही म्हणाले की, तोंडाला रक्त लागलं वर्षा बंगल्याचं, सत्तेचं की त्यांना ती शिकार सोडाविशी वाटत नाही. उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावल्यानंतर त्यांना पदाला चिटकून राहणं योग्य वाटल नाही, तेव्हा त्यांनी तत्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बंगला सोडला. त्यांना मोह नाही, पद मिळालं काम केलं. पद गेलं तर सत्ता सोडली आणि निघून गेले. पण हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना जमलं त्यांनी केली, ज्यांना जमलं नाही ते आदळआपट करत राहिले, अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय.
