Uddhav Thackeray : लाडकी बहीण, वन पार्टी वन इलेक्शन ते ठाकरे गटातील आऊटगोईंग; बघा मुलाखतीचा नवा टीझर
‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. समानाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या या मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या मुलाखतीचा नवा टीझर पाहिलात?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा काल पहिला टीझर आऊट करण्यात आला. ज्यामध्ये ‘आता राज ठाकरेही बरोबर आले आहेत’, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आणि पुन्हा राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दलच्या चर्चा सुरू झाल्यात. अशातच आज संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे लाडकी बहीण योजना, महापालिकेच्या पैशांवर डल्ला, विधानसभा निवडणुकांचे निकाल, वन पार्टी वन इलेक्शन, ठाकरे गटातून सुरु असलेली आऊटगोईंग आणि जातीपातीचे राजकारण या मुद्द्यांवर राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी रोखठोक भाष्य केल्याचे पाहायला मिळतंय.
ब्रँड ठाकरे!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सूपर फ़ास्ट मुलाखत!
सामना
१९ आणि २० जुलै! pic.twitter.com/Hj9eSMRHkO— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2025
