Udhav Thackeray : बैठकीत मनसे सोबतच्या युतीला ग्रीन सिग्नल; उद्या ठाकरे बंधूंच्या युतीचा निर्णय होणार?
Thackeray Brothers Reunion : ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी मनसे सोबतच्या युतीला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे याबाबत ठाकरे उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी मनसे सोबतच्या युतीला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीवर उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आज मुंबईमध्ये ठाकरेसेनेच्या माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरेंच्या सोबत बैठक पारपडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसे युतीबाबत माजी नगरसेवकांना विचारणा केली. त्यावर या नगरसेवकांकडून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. युती केली तर फायदाच आहे. मुंबईत मनसेसोबतच्या युतीला अनुकूल वातावरण आहे, असं मत या बैठकीत माजी नगरसेवकांनी मांडलं आहे. युतीसंदर्भात पक्षप्रमुखांनी निर्णय घेण्याचं देखील माजी नगरसेवक म्हणालेत. पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू, असंही माजी नगरसेवकांनी सांगितलं आहे. मनसेसोबत युती व्हावी हे मराठी माणसाचं मत असल्याचं म्हणत बैठकीत सर्व माजी नगरसेवकांचं एकमत झालं आहे.
