मी घटनातज्ज्ञांचा सल्ला घेतलाय, 16 आमदार अपात्र व्हायलाच पाहिजेत- उद्धव ठाकरे

मी घटनातज्ज्ञांचा सल्ला घेतलाय, 16 आमदार अपात्र व्हायलाच पाहिजेत- उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 20, 2023 | 2:44 PM

मी घटनातज्ज्ञांचा सल्ला घेतलाय, 16 आमदार अपात्र व्हायलाच पाहिजेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. शिवाय त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. पाहा...

मुंबई : मी घटनातज्ज्ञांचा सल्ला घेतलाय, 16 आमदार अपात्र व्हायलाच पाहिजेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. ” निवडणूक आयोगाचा निकाल आयोग्य आहे. घटनाक्रम जो घडला आहे. त्यानुसार निकाल अपेक्षित आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी उद्यापासून सुरू आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी निकाल देऊ नये अशी मागणी होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. दोन तृतियांश एका संख्येने गेले नाही. आधी 16 गेले. त्यांची केस सुरू आहे. त्यानंतर 23 जणांच्या अपात्रतेची केस सुरू आहे. टोटल मारली तरी दोन तृतियांशांना कोणत्या तरी पक्षात विसर्जित झाले पाहिजे. असं घटनेत म्हटलंय. त्या आधी आयोगाने घाई करण्याची गरज काय होती?”, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

Published on: Feb 20, 2023 02:29 PM