Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! युतीची उद्या होणार घोषणा, ‘या’ 7 पालिकांसाठी एकत्र लढणार

Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! युतीची उद्या होणार घोषणा, ‘या’ 7 पालिकांसाठी एकत्र लढणार

| Updated on: Dec 23, 2025 | 5:25 PM

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत होणार आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जागावाटप पूर्ण झाले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह एकूण सात पालिकांसाठी हे पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा केली जाईल. संजय राऊत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटप यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, यामध्ये कोणतीही रस्सीखेच नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. या युती अंतर्गत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या सात महानगरपालिकांसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. कार्यकर्त्यांनी ही युती स्वीकारली असून, कोणताही विसंवाद नसल्याचे राऊत यांनी नमूद केले. या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राजकारणात कुणीही एकत्र येऊ शकते किंवा वेगळे होऊ शकते, अशी प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांकडून आली.

Published on: Dec 23, 2025 05:25 PM