Uddhav Thackeray : एकजुटीचं दर्शन घडवल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
Uddhav Thackeray News : हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याच्या निर्णयावर आज उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात व कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला आहे. हा नारा बुलंद करण्यात शिवसेना व शिवसैनिक आघाडीवर होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना हिंदी भाषा सक्तीच्या जीआर रद्द केल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, सरकारला शहाणपण सुचले की नाही हे येत्या काही दिवसांत कळेल. पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यांनी हा जीआर रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात सत्ताधारी भाजप, एसंशिं गट व अजित पवार गटाचे अनेक नेते सहभागी झाले असते. कारण आता मराठी माणसांची एकजूट आता झालेली असल्याचं सांगत धन्यवाद दिले.
