Udhav Thackeray : वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप

Udhav Thackeray : वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप

| Updated on: Apr 06, 2025 | 3:43 PM

Udhav Thackeray Press : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे. वक्फच्या जमिनीवरून ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप वक्फ बोर्डाच्या जमीनी घेणार आणि त्यांचा मित्रांना देणार आहे. त्यानंतर पुढची पायरी ख्रिश्चिन समाजाकडे असणाऱ्या जमिनी घेणार आहे, असा आरोप उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना वक्फ बोर्डाचा जमीनीवरून ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. हळूहळू बौद्ध, शीख, जैन धर्मांकडे असणाऱ्या जमिनी सरकार घेणार आहे. मग हिंदू देवस्थांनाच्या जमिनीवरसुद्धा त्यांचा डोळा असणार असल्याचं देखील ठाकरेंनी यावेळी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फ बोर्डावर आम्ही आमची भूमिका मांडली आहे. या बिलाबाबत भाजपला हिंदूंचे काही घेणे देणे नाही. त्याचा छुपा अजेंडा ऑर्गनायजरने उघड केला आहे. भाजप ख्रिश्चिन समाजाकडे असणाऱ्या जमीन घेणार आहे. भाजप या सर्व मोक्याच्या जमिनी घेऊन त्यांच्या मित्रांना देतील. भाजपचे हे प्रेम समाजाबद्दल नाही. त्यांच्या मित्रांवर आहे. त्याला आमचा विरोध आहे. धर्माधर्मात भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. धर्मांचे विष भाजप पेरत आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे, ती विष पेरणाऱ्यांना दूर ठेवले पाहिजे. लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावत आहे, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला.

Published on: Apr 06, 2025 03:42 PM