Udhav Thackeray : मनसेसोबत युतीचा निर्णय लवकरच होणार? ठाकरेसेनेच्या बैठकीत काय झाली चर्चा..

Udhav Thackeray : मनसेसोबत युतीचा निर्णय लवकरच होणार? ठाकरेसेनेच्या बैठकीत काय झाली चर्चा..

| Updated on: Jun 18, 2025 | 3:33 PM

Udhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरेंकडून मुंबई माजी नगरसेवकांना मनसेसोबतच्या युतीबाबत विचारणा करण्यात आलेली आहे.

मनसेसोबत युती करायची की नाही, यासंदर्भात लवकरच निर्णय होईल. उद्धव ठाकरेंकडून मुंबई माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आलेली आहे. याबद्दलची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक झाली. त्यावेळी मनसेसोबतच्या युतीवर ठाकरेंनी प्रश्न विचारला आहे. त्यामुळे लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीचा निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत एकत्र येण्यावर भाष्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्याला लागलीच सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक पातळ्यांवर मनसे आणि ठाकरे सेनेचे पदाधिकारी – कार्यकर्ते एकमेकांच्या भेटी घेत मनोमिलन करताना देखील दिसले. ठीकठिकाणी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे बॅनर देखील सातत्याने झळकत आहे. जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर आज शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युती बाबत विचारणा केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Published on: Jun 18, 2025 03:33 PM