ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी

ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी

| Updated on: Apr 27, 2025 | 5:31 PM

ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. अशातच आज थेट मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत यासाठी पुन्हा एकदा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून राज्याच्यात राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यासाठी आता पुन्हा एकदा थेट मातोश्री बाहेरच जोरदार बॅनरनजी केलेली बघायला मिळत आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे. शिवसेना उबाठा गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. ‘मायेची सावली, एक हात कर्तव्यचा’ अशा आशयाचं हे बॅनर असुन ‘उद्धवसाहेब आणि राजसाहेब  आपण एकत्र या, महाराष्ट्राची जनता आपली वाट बघत आहे.’ असंही या बॅनरवर लिहिलेलं आहे.

Published on: Apr 27, 2025 05:31 PM