Ujjwal Nikam : सरकारी वकील उज्ज्वलनिकम यांची राज्यसभेवर वर्णी
Ujjwal Nikam News : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली. त्यांच्यासह सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेसाठी नामनिर्देशन देण्यात आले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) निवडणूक लढवणाऱ्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला होता. मात्र, आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना खासदारकीची संधी मिळाली आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ आणि गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून आपली प्रभावी छाप पाडणारे अशी अॅड. उज्ज्वल निकम यांची ओळख आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू आणि प्रख्यात व्यक्तिमत्त्व आता संसदेत प्रतिनिधित्व करणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. निकम यांच्यासह आणखी तीन जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे.
