Ulhasnagar : टाळ्या न वाजवल्याने ‘ती’ भडकली, शिक्षिकेचे कोवळ्या जीवासोबत भयंकर कृत्य, मनसेने दाखवला इंगा
उल्हासनगरमध्ये एका प्लेग्रुपची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेने चिमुकल्याला जबर मारहाण केली. या प्रकरणी मनसे चांगलेच आक्रमक झाली आहे.
उल्हासनगर शहरात एका प्लेग्रुपमध्ये कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेने चिमुकल्याला मारहाण केली. एकदा नव्हे, तर तीन वेळा कानाखाली मारली असल्याचा संतापजनक प्रकार उल्हासनगरच्या प्ले ग्रुपमध्ये घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. उल्हासनगरच्या प्ले ग्रुपमध्ये घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि दोन्ही पक्षांशी चर्चा करून या प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
Published on: Sep 22, 2025 02:34 PM
