‘सगेसोयरे’चा अल्टिमेटम दोन दिवसात संपणार, 13 तारखेपर्यंत निर्णय नाही घेतला तर…जरांगेंचा सरकारला इशारा

‘सगेसोयरे’चा अल्टिमेटम दोन दिवसात संपणार, 13 तारखेपर्यंत निर्णय नाही घेतला तर…जरांगेंचा सरकारला इशारा

| Updated on: Jul 11, 2024 | 5:32 PM

13 तारखेनंतर बैठक घेऊन त्या बैठकीतून मोठा निर्णय घेण्यात येणार, असा इशाराच सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी जायला हवं होतं, असं म्हणत एकानं हाणल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं हा सरकारचा डाव दिसतोय, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय

मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा सभा घेणं सुरू केलं आहे. सगेसोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत येत्या 13 तारखेला संपणार आहे. अशातच 13 तारखेपर्यंत निर्णय नाही घेतला तर मराठ्यांची बैठक बोलावणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर 13 तारखेनंतर बैठक घेऊन त्या बैठकीतून मोठा निर्णय घेण्यात येणार, असा इशाराच सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी जायला हवं होतं, असं म्हणत एकानं हाणल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं हा सरकारचा डाव दिसतोय, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठा आणि कुबणी एकच असून सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली होती. त्यामुळे 13 तारखेनंतर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Jul 11, 2024 05:32 PM