अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचं निधन, शाह यांचे सर्व कार्यक्रम रद्द

अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचं निधन, शाह यांचे सर्व कार्यक्रम रद्द

| Updated on: Jan 15, 2024 | 6:15 PM

अमित शाह यांच्या मोठ्या बहीण राजेश्वरीबेन शाह यांचं मुंबईत निधन झालं आहे. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात राजेश्वरीबेन शाह यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राजेश्वरीबेन यांच्या फुप्फुसांचं काही महिन्यांपूर्वी ट्रान्सप्लान्ट झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर एचएन रुग्णालयात उपचार सुरु होते यादरम्यान त्यांचं निधन झालं.

मुंबई, १५ जानेवारी २०२४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहीण राजेश्वरीबेन शाह यांचं मुंबईत निधन झालं आहे. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात राजेश्वरीबेन शाह यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राजेश्वरीबेन यांच्या फुप्फुसांचं काही महिन्यांपूर्वी ट्रान्सप्लान्ट झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर एचएन रुग्णालयात उपचार सुरु होते. राजेश्वरीबेन यांच्या मृत्यूनंतर अमित शाह यांचे गुजरातमधील नियोजित पुढच्या दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत शाह कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत राजेश्वरीबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भगिनी श्रीमती राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांचे जाणे हे समस्त शाह कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमितभाई आणि समस्त शाह कुटूंबियांना मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना’, असे ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 15, 2024 06:15 PM