पाथर्डीच्या हनुमान टाकळी गावाची अनोखी प्रथा! नवस फेडतानाचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 28, 2022 | 10:41 AM

हनुमान मंदिरात एक चर खोदला जातो आणि त्या चरीत विस्तव तयार केला जातो. त्या विस्तवावरून भाविक चालत जातात आणि नवस फेडतात.

Follow us on

पाथर्डी: अहमदनगरचा (Ahemadnagar) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हनुमान टाकळी हे पाथर्डी मधलं गाव. या गावात सध्या यात्रा सुरु आहे, या यात्रेतलाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video Yatra) होतोय. या यात्रेत हनुमानाला केलेला नवस फेडण्यासाठी एक अनोखी प्रथा आहे. नवस फेडण्यासाठी भाविक विस्तवावरून चालत जातात. हनुमान मंदिरात एक चर खोदला जातो आणि त्या चरीत विस्तव तयार केला जातो. त्या विस्तवावरून भाविक चालत जातात आणि नवस फेडतात. हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ही हनुमान टाकळी(Hanuman Takali, Pathardi) या गावाची जुनी प्रथा आहे. तब्बल 369 वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे.