Uday Samant | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठं, महाविद्यालय बंद असली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू

| Updated on: Jan 05, 2022 | 9:49 PM

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना देण्यात आल्यात. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना दिल्यात. 50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार.

Follow us on

YouTube video player

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलाय. राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थ सहाय्यीट विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. परीक्षाही ऑनलाईन होणार. काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी द्यावी. प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना देण्यात आल्यात. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना दिल्यात. 50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार. हे सगळे नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.