Rohit Arya Pune Connection : रोहित आर्याचे पुणे कनेक्शन समोर
रोहित आर्याचे पुणे कनेक्शन समोर आले असून, वर्षभरापूर्वी तो कोथरूडमधील स्वरांजली अपार्टमेंटमध्ये राहत होता. याच काळात त्याने राज्य सरकारकडे थकीत रकमेसाठी आणि इतर मागण्यांसाठी उपोषणही केले होते.
रोहित आर्याच्या कथित एन्काऊंटरनंतर त्याच्या जीवनातील अनेक पैलू समोर येत आहेत. यात त्याचे पुणे कनेक्शन महत्त्वाचे ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी रोहित आर्या पुण्यातील कोथरूड येथील स्वरांजली अपार्टमेंटच्या ए विंगमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. तो शिक्षण विभागासाठी राबवत असलेले विविध प्रकल्प याच ठिकाणाहून संचालित करत होता.
रोहित आर्याच्या पुणे कनेक्शनमध्ये त्याच्या उपोषणाचाही उल्लेख आहे. वर्षभरापूर्वी त्याने पुण्यात राज्य सरकारविरोधात उपोषण केले होते. त्याच्या स्वच्छता मॉनिटर अभियान आणि माझी शाळा सुंदर शाळा यांसारख्या प्रकल्पांसाठी सरकारकडून येणे असलेली थकीत रक्कम आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
Published on: Oct 31, 2025 03:31 PM
